मराठी कविता आणि चारोळ्या - माझी लेक Ebook

“मराठी चारोळ्या आणि कविता” व्हाट्सॲप समूहाच्या पहिल्या वर्षपूर्ती निमित्त “माझी लेखणी” ई-काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे.
ई-काव्यसंग्रहा मध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी व नियम –
१)     प्रत्येक कवी ने स्वलिखीत कविता पाठवाव्या अन त्या कुठेही प्रकाशीत झालेल्या नसाव्या. आणि ई-पुस्तक प्रकाशित होई पर्यंत अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये. 
२)     प्रत्येकी २ दर्जेदार कविता पाठवाव्या त्यातून १ कविता निवडली जाईल.
३)     प्रत्येकी ४ चारोळ्या पाठवाव्या त्यातून प्रत्येकी २ चारोळ्या निवडल्या जातील.
४)     एक कवी स्वतःच्या २ कविता आणि ४ चारोळ्या पाठवू शकतो.
५)     आपल्या कविता mkcwapp@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा किंवा ८६५२२२८६५० या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सॲप करा किंवा खाली दिलेल्या फोर्म व्दारे पाठवा.  
६)     कविता पाठवताना विषय : ईबुक साठी असे नमूद केलेले असावे. सोबत स्वतःचे संपुर्ण नाव, ठिकाण आणि ई-मेल पत्ता देणे आवश्यक.
७)     दिनांक ६ जुलै २०१७ ते ३१ जुलै २०१७ रात्री १२.०० पर्यन्त कविता स्विकारल्या जातील. निर्धारित वेळेतच आलेल्या कविता/चारोळ्या पुस्तकाकरिता ग्राह्य धरल्या जातील.
८)     हे ई-पुस्तक मोफत असेल त्यामुळे त्यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नाही.
९)     सहभागी झालेल्या प्रत्येकास प्रशस्ती-पत्र त्यांच्या ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात येईल.
वरील सर्व अटी सहभागी झालेल्या प्रत्येकास लागू असतील.
धन्यवाद
मराठी चारोळ्या आणि कविता
संचालक

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.