स्वरा - अलका

स्वरा......
वाग्वरदायिनि
हंसवाहिनी शारदा
सरस्वती च्या कृपा प्रसादे
वैखरी..उच्चराती जाहली
जो स्वर पहिला
वाणींतून आलेला नाद
म्हणजेच आवाज
जो दूर अवकाशांत
घुमतो एक मंत्र स्वरूपात
'ओंकार' जो पहिला नाद -ब्रह्म
पहिला शब्द...भरून राहिलेला
मनामनांत हृदयात...
तीच का ?सुरुवात
नादब्रह्माची....शब्दाची
जन्मला सखे शब्द...
उच्चारण आणि लेखणीतुन
साकारल्या भाषा....
पौराणिक भाषा मूळ..
संस्कृत मुळभाषा माय माउली
मोडिलिपी च्या युगातून
चालत चालत भाषा
भरपूर फिरत बदलत आली
मायबोली व्यकरणाचे
दागदागिने अलंकार
ते बहुत लेईली ....
माय बोली समृद्ध जाहली
शब्दाचे अमृत पिऊनी
ऊंच मनोरे फुलवत
भाषा उन्नत जाहली
शब्दलंकाराचे मुकुट लेउनी
नवांकुरांचेभावविलोरे
घेऊन चालत माय बोली
अजून आज सुंदरच जाहली
स्वर साज चढवत मुकुटाचा
मायबोली जगात
साऱ्या नाव पावली......!!!!
#अलका

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.