शुभेच्छांचे इमले... - विद्या



शुभेच्छांचे इमले
चढू देत ढीगभर
कौतुकाच्या पसाऱ्यात
स्वतःला तूं सावर
पूर्वी...
पूर्वी फक्तं रात्रच
वैऱ्याची असायची
आता मात्र क्षणालाही
उसंत नाही
जपून ठेव ..... आत्मभान
होताना आत्मनिर्भर
ढळू नको देउस
निखाऱ्यावर चालताना
तोल तुझा क्षणभर...
#विद्या

No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.