काळाच गुपित - चारोळ्या


भूतकाळ विसरवतो
भविष्यकाळ खुणावतो
वर्तमान आपल्याला
आपल्यात मिळवतो.....!!!
#अलका
-------------

काळाच गुपित

किती अजब आहे
कितीहि पळालो तरी
काळ पुढे मागेच आहे...!
@ लक्ष्मीकांत
-------------

भुतकाळात रमणे मला जमत नाही
पण आठवणीत तुझ्या रमल्या शिवाय
दिवसाची सुरुवात होत नाही
कळी तुझ्या गालावरील नजरे समोरून
हटत नाही
बोलघेवडी छबी तुझी मनांतून उतरत नाही
क्षणभर पावले ही घुटमळतात त्या फेसाळलेल्या किंनाऱ्यावर
तुला आठवल्या शिवाय पुढे जाणेच होत नाही
भूतकाळात मी रमत नाही पण तुला आठवल्या शिवाय दिवस ही माझा सरत नाही
#प्रमोद मोघे
--------------
भूत काळ आनंद
 देतो रमवतो मनाला
अन भविष्याची जाणीव
नवी स्वप्ने खुणावती मनाला.....!!
#अलका
---------------
भुतकाळांच्या वाटांना
फाटे अनंत
कधी गुलाबाचा सहवास
तर कधी काटे अनंत
विद्या🙂
---------------
भुतकाळाच्या आठवणी जुन्या,
वर्तमानात घटना नव्या,
भविष्याची ती सांगता ,
काळ ठरवी आयुष्याच्या क्षणा.
गौरी-
----------------
पुन्हा पुन्हा आठवांना
हिंदोळा देउ नकोस
प्रतिबिंबे मनातली
तू उघड करु नकोस

विद्या..

-------------
भुतकळात रमायच नसतं
वर्तमानात जगायचं असतं
भविष्याची चिंता सोडून
काळा सोबत चालायचं असत.
#माधवी
-------------
काळाला सोडा
प्रेमाचं बोला
काळ त्याचं काम करतो
आपण आपलं कर्म करा.....!!!

#अलका
-------------
प्रत्येक वेळी भूतकाळ
वर्तमानवर हावी होतो ...
वर्तमानापेक्षा मग ...
भूतकाळच जवळचा वाटतो
#मंथन
----------------
भूत काळात रमाव
पण एक क्षण
वर्तमानात जगावं
आयुष्य प्रत्येक क्षण.....!!
#अलका
---------------
आठवणीत रमताना
मन हरवून जातं
वर्तमानातील तुझ्या सवे
आयुष्य सुंदर बनतं
           विद्या.
--------------
भिती वाटी मना भारी,
भुतकाळी रमल्या वरी,
वर्तमाना परी कोण जवळी
भविष्यात कोण तारी.
गौरी-
----------------------
भविष्यापेक्षा कधी  कधी,
भुतकाळ बरा वाटे,
आठवणी मनाच्या मनी असती,
कोणी ना बदलु  शकती,
ना कधीही हरवती.
गौरी-
---------------






No comments

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.