रुजवून घे... - विद्या

रुजवून घे श्वासात, तूं
जिजाऊला नि झाशीच्या राणीला
अन बघ कसा
अंकुरतो
शिवाजी तुझ्यांत..
उधळून दे मावळ्यांना
मनाच्या....
चौफेर कडा कोटांत
झटकून दे जोखड
बंधनांचे
पादाक्रांत करताना
अवकाश जगाचे
वेळोवेळी असू दे स्मरण
भवानीच्या आशिर्वादाचे
ज्यातून
मिळू दे तुला बळ
सशक्त आत्म्याचे
गड सर होणारच
तुझ्या ध्येयाचा
वाटेतील पडझडीने
खचू नकोस जरा
यशाने उजळू दे
तुझ्या मनाचा गाभारा

#विद्या..

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.