महिला दिन - मंथन

महिला दिन
आई ला म्हटले सकाळी
आज तुमचा दिवस आहे
पुरुष वर्ग आज सारा..
जास्तच सावध आहे ...

आई चे उत्तर ...

काय कसला महिला दिन
फक्त एका दिवसाचे चोचले
महिलांचे आयुष्य बघ
सारे चुलीत गुरफटलेले ..

महिला म्हणे पुढे गेल्या ..
आजकाल पुरुषांच्याही..
सन्मान मात्र कधीच नसतो
मनात त्यांच्याही ...

भ्रूणहत्या वाढली
प्रमाण घटले मुलींचे
तेव्हाच  उघडले
डोळे सरकारचे

दिवसाआड एक स्त्री
वासानेला बळी पडते
महिलांचा सन्मान करता
मग असे का घडते ..?

आई बहीण पत्नी ..
सारी नाती निभावते
तरीही का मग ...
स्त्री कमी ठरते ..?

नवनवीन योजनेने
सरकार भरते झोळी
कसला सन्मान करताय
इथे बळी पडतेय नारी ..

माहिला दिनाचे फलक
जागोजागी लागतील ...
प्रत्येक जन शुभेच्छांचे ..
साखर फुटाणे वाटतील

एक दिवस कधी तरी
आम्हाला मान द्याल
मुलगी झाली म्हणून
तिचा जीव घ्याल ..

आई बहिणी प्रमाणे
साऱ्या महिलांना वागवा
ऐकशील ना  रे तू तरी
एवढा माझा सांगावा

किती सांगू आता
आमची ही व्यथा
असचं चालू राहायचं
त्यास नाही अंत आता
#मंथन

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.