महिला दिन - अलका

जागतिक महिला दिन
दोन अक्षर माझे पण.....
सर्व महिलांच्या वतीने....

तू आई
तू ताई
तू आजी
तू बाईचं शेवटी
तू आहेस नारी
तू वारस नाहीस घराण्याचा
पण वारस तूच देशील घराण्याला
नाव मोठं राखण्यास कुळदीपक तूच देशील...
स्त्री जन्म घेतलास अन होळी जीवनाची केली.....
पुराणातही स्त्री बस आगीत होरपळून गेलीं...सीता....
अग्नि परीक्षेला उगीच का सामोरी गेली....
अन मंदोदरी तिचं काय....तिची तर रोजच होती उखळातली गती...
तोड दाबून मुकं पणानं झेलत राहिली सगळे अत्याचार रावणाचे
नांव किती सांगायचे ....
तेंव्हापासून आत्ता चे...
अहिल्या ,सीता,द्रौपदी...
मीरा ,राधा,रुक्मिणी....ते राणी झाशीची पण होतीत्यांच्या सोबतीची
काय सांगू किती अन कसं सांगू
पुराणात ले अन इतिहासातले
सगळे सोडा...
वर्तमानही त्यात जोडा...
आताच तर भीषण चित्र आहें
महिला दिन साजरा करून
त्यांचे  एक दिवस गोडवे गाऊन
बस काय....
विचारा एकच क्षण ....
आपुल्याच मनाला....
आई...पायी स्वर्ग असतो तिच्या
तिचे अन्याय कुणाला सांगू
ताई बाई माई कुणी कुणीच
सुटले नाही....
पाहू काही उपयोग का
लिहण्याचा या पोथीचा
कीं वाचून फेका कचरा नुसता
उद्या चे जैसे थें....
गरज थोडीशीच आहें
मानसिकता बदलण्याची
दृष्टी कोण मानवीय ठेवण्याची
तिलाकाही नको...
फक्त जगु द्या फुलू द्या
कोवळ्या कळी ला उमलू द्या
एक हात द्या प्रेमाची साथ द्या
विश्वास द्या
आश्वासक एक कटाक्ष द्या
बस.......!!!!!!

#सौ अलका यशवंतराव देशमुख

8 comments:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.